। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार जसप्रित बुमराहने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वासंदर्भात मोठे विधान केले. जर मला संधी मिळाली तर कॅप्टन्सीचा ताज मिरवायला आवडेल, असे तो म्हणाला. यावेळी त्याने कोहलीसंदर्भातही भाष्य केले. कोहलीने जरी संघाचे नेतृत्व सोडले असले तरी तो लोकेश राहुलला योग्य ती मदत करत राहील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना 19 जानेवारीला रंगणार आहे. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी उप कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रसारमाध्यमांसमोर अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.