स्मार्ट मम्मीज ग्रुपकडून अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
पनवेलकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल स्मार्ट मम्मिज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी रॅम्प वॉक अर्थात फॅशन शोचे आयोजन केले होते. पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार, दि.17 एप्रिल रोजी हा शानदार फॅशन शो संपन्न झाला. विशेष म्हणजे, कर्णबधीर मुलांनीदेखील या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत उपस्थितांची वाहवा मिळवली. माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची या फॅशन शोला विशेष उपस्थिती होती.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजयुमो चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, ममता प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होणार्या मुलांसाठी आठ वर्षाखालील व आठ वर्षावरील ते 13 वर्षांपर्यंत असे दोन गट बनविण्यात आले होते. ग्रुप ए मध्ये पनय वीरा हा प्रिन्स ठरला, तर आरोही मजिठीया प्रिन्सेस ठरली. तर ग्रुप बी मध्ये रेनित ठक्कर याला प्रिन्सचे टायटल मिळाले, तर वेदिका पवार हिने प्रिन्सेस चे टायटल जिंकले.
ग्रुप ए मध्ये मुलांच्यात स्वयम् थोरात दुसर्या स्थानी आला, तर वेद गांधी याने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्यात अवंतिका धात्रक ही फर्स्ट रनर अप ठरली, तर सानवी कदम ही सेकंड रनर अप ठरली. मोठ्यांच्या बी ग्रुप मध्ये मुलांच्यात अथर्व भोईर फर्स्ट रनर अप ठरला, तर आराध्य म्हात्रे सेकंड रनर अप ठरला. मुलींच्यात काव्या सोनेटा फर्स्ट रनर अप, तर शनाया गांधी सेकंड रनर अप ठरली. याव्यतिरिक्त जियाना मुलजी हिने बेस्ट स्माईल, कियारा जैन हिने बेस्ट अटायर, अमैरा शहा हिने मिस ब्युटिफुल, सानवी कदम हिने बेस्ट वॉक, आरोही पाठारी हिने मोस्ट स्पार्कलिंग आईज ही टायटल पटकावली. मुलांच्यात समर्थ चौहान यास बेस्ट वॉक, पनय विरा बेस्ट अटायर, स्वयम् थोरात बेस्ट फोटोजेनिक फेस, वेद गांधी मोस्ट कॉन्फिडंट, धियांश ठक्कर यास रायझिंग स्टार अशी टायटल मिळाली.
मोठ्या ग्रुपमध्ये सान्वी तडके हिला मोस्ट फोटोजेनिक फेस, जानकी वारिया हिला रायझिंग स्टार, पूर्वा लामतुरे हिला मिस स्टायलिश, रीतन्या म्हात्रे हीला ब्यूटीफुल हेयर, तर स्वरा शिंदे हिला मोस्ट कॉन्फिडन्ट ही टायटल्स देण्यात आली. तर मुलांच्या ग्रुपमध्ये रेनीत ठक्कर याला स्टाईल आयकॉन आणि आराध्य म्हात्रे याला हँडसम हंक हे टायटल देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, रोटरी क्लब संचालित कर्णबधीर मुलांच्या शाळेतील मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने रॅम्पवॉक सादर केला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या मुलींचे रॅम्पवर स्वागत केले. स्मार्ट मम्मी च्या वतीने या मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या. या फॅशन शो साठी डॉक्टर स्वाती हांडे, सोनी ठक्कर, आणि नंदिनी भाटकर यांनी जजेस म्हणून अत्यंत चोख पद्धतीने काम पाहिले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल ठक्कर यांच्या बरोबरीने नैना बाठीया, नीता कोटक, कविता ठाकूर, मेघना भानुषाली, नेहा गांधी यांनी अथक परिश्रम घेतले. तर आपल्या बहारदार आवाजात आणि शेरो शायरीच्या अनोख्या बरसातींनी कोमल वीरा यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात अनोखा बहर आणला. वैभव जोशी यांच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांनी घरबसल्या या फॅशन शो चा यु ट्युब लाईव्ह वर आनंद लुटला.
कर्णबधीर मुलांच्या रॅम्पवॉकने मिळविली वाहव्वा
