| पनवेल | वार्ताहर |
मंदार काणे एंटरटेनमेंट प्रेसेंटस चित्र मराठी फॅशन शो 2023 मोठ्या दिमाखात फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडला. या रनवे शो मध्ये 50 हुन अधिक तरुण-तरुणी मॉडेल्सनी सहभाग घेतला होता. यावेळी अभिनेत्री शैली बिडवइकर, काजल काटे, सिद्धी पाटणे, रंजना सिंग, दीप्ती हलंकर, अंजली मचा, नीता दोंदे, अश्विनी कासार, सौम्या रेश्मा, कोमल शेटे, सायली वर्तक उपस्थित होते. यावेळी रॅम्पवॉक करताना 50 हुन अधिक तरुण-तरुणी मॉडेलनी आपल्या दिलखेच अदा सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमांसाठी अंजली परदेशी, झेबा चौधरी, विजय सोनी यांनी विशेष लक्ष देऊन आकर्षक ड्रेस उपलब्ध करून दिले. त्याचसोबत नीता क्रिएशनच्या नीता म्हात्रे पाटील, मोनल घोलप यांनी संपूर्ण मेकअपची जवाबदारी पार पाडली. सिद्धेश परब, रवी चव्हाण, ओंकार चिकलकर, सिद्धेश पावसकर, मंदार सुर्वे, नितेश, विक्रांत यांनी संपूर्ण शो साठी विशेष सहकार्य केले.