घातपाताचा कहर! पत्नी माहेरी गेल्याने रागावलेल्या पतीने हातोडयाने केली मारहाण

पतीला केली पोलिसांनी अटक

मुरुड । प्रतिनिधी ।
पत्नी माहेरी गेल्याने रागावलेल्या पतीने लाकडाच्या रिपेने तिला शिवीगाळ करीत हातोडयाने डोक फोडले मारहाण केली. लाथेने देखील झालेल्या मारझोडीने दुखापत झालेल्या पत्नीच्या तक्रारीवरुन पतीला मुरुड पोलिसांनी अटक केली आहे.

मुरुड पोलीस ठाणे हद्दीत 07 जुलै रोजी टक्का अदिवासीवाडी येथे राहणारी महिला फिर्यादी ही आपल्या माहेरी विहूर येथे निघुन गेली होती. ती परत आल्यानंतर आपल्या राहत्या घरी टक्का अदिवासीवाडी येथे पडवीत बसली असताना ती माहेरी विहुर येथे निघुन गेल्याच्या रागातुन पतीने तीला शिवीगाळी व लाथेने मारहान करून लाकडी रिपेने डाव्या हाताचे कोपरावर व उजव्याहाताच्या मनगटावर फटके मारून दुखापती केली. तसेच लोखंडी हातोडयाने डाव्या पायाचे नडगीवर व डोक्याच्या डाव्या बाजुला मारून दुखापत केली आहे. जखमी अवस्थेत सदर महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुरुड पोलिसांनी त्वरीत गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गिरी हे करीत आहेत.

Exit mobile version