हरीश साळवेंच्या दाव्याने खळबळ
| पॅरिस | वृत्तसंस्था |
ऑलिम्पिकमधील कुस्तीपटू विनेश फोगाटचं अपात्र ठरणं कोणीच विसरू शकत नाही. विनेश फोगाट सुवर्ण पदकाच्या वेशीवर उभी असताना अचानक घडामोडी घडल्या आणि एका रात्रीत अपात्र ठरली. 50 किलो वजनी गटापेक्षा तिचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने अपात्र ठरली. त्यानंतर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. भारत सरकारने जाणीवपूर्वक मदत करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विनेश फोगाटने केला होता. तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्षा पीटी ऊषा फक्त फोटो काढण्यासठी तिथे आल्याचा आरोप केला होता. विनेश फोगाटचे हे आरोपी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) मध्ये विनेशची बाजू हरीश साळवे यांनी मांडली होती. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यात त्यांनी भारत सरकारची यात कोणतीच भूमिका नसल्याचं सांगितलं. कारण भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सरकारपासून वेगळं आणि स्वतंत्रपणे काम करावं लागतं. जर सरकारने हस्तक्षेप केला तर संघटना बाहेर केली जाते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पूर्वी अपात्र ठरल्या नंतर विनेश फोगाटसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सचं दार ठोठावलं होतं. पण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचं म्हणणं योग्य असल्याचं सांगत विनेश विरुद्ध निकाल दिला. आता हरीश साळवेंनी दावा केला आहे की, भारतीय ऑलिम्पिक संघटना या विरोधात स्वीस कोर्टात आव्हान देणार होती. पण विनेशने तसं करण्यास नकार दिला. हरीश साळवेंच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. विनेशवर आता खोटं बोलल्याचा आरोप होत आहे.दरम्यान, हरियाणात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरली आहे. काँग्रेसने तिला जुलाना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.यावेळी प्रचार करताना भाषणात विनेशने भारत सरकार आणि पीटी ऊषा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.पॅरिसमध्ये आजारी पडल्यानंतर पीटी ऊषा भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी विना परवानगी घेत फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले असा अरोप केला होता.