लेखक शिरीष कणेकर कालवश

| मुंबई | प्रतिनिधी |
सिद्धहस्त लेखणीनं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पत्रकार, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या शिरीष कणेकर (वय 80 ) यांचे मंगळवारी निधन झाले. चित्रपट, संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर खुमासदार लेखन करुन त्यांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले होते. समाजकारण, राजकारण, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील विविध घडामोडींवर त्यांचे लेखन वाचकप्रिय झाले होते. त्यांचे कणेकरी, माझी फिल्मबाजी नावाचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय होते.

कणेकर यांना काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरविण्यात आले होते. याशिवाय साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. विविध वृत्तपत्र, मासिकांमधून चित्रपट, साहित्य आणि क्रीडाविषयक क्षेत्रातील अनेक घडामोडींवर त्यांनी केलेलं लेखन लोकप्रिय झाले होते. त्यांची 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Exit mobile version