शिपाई पदासाठी लेखी परीक्षा

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 149 पोलीस शिपाई पदासाठी रविवारी (दि.28) लेखी परीक्षा शांततेत पार पडली. शहरातील 5 सेंटरवर ही परीक्षा घेण्यात आली असून सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची झुंबड पहावयला मिळाली. शारिरीक चाचणी परीक्षेत 50 टक्के गुण मिळविलेल्या उमेदवारांचीच निवड लेखी परीक्षेसाठी केली होती. त्यानुसार 1 हजार 634 उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे 524, मेस्त्री हायस्कूल येथे 220, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय येथे 336, गंगाधर गोविंद पटवर्धन हायस्कूल (जीजीपीएस) येथे 98 तर शिर्के हायस्कूल येथे 438 महिला उमेदवारांच्या लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.

Exit mobile version