कातकर्‍यांच्या जमिनीवर चुकीचे वारसदार

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी समाजातील व्यक्तींच्या जमिनीचे अवैध्य पद्धतीने हस्तांतरण झाल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. उरण तालुक्यातील मौजे दिघोडे येथील सुर्वे नंबर 94/8 आणि 100/1 ह्या पाच एकर जमीन मिळकती संदर्भात चुकीची वारस नोंद झाल्याचे तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे यांच्या सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र मढवी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले. परंतु सुरवातीला त्यांनी सदरहू प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचे पाहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.

हे प्रकरण मान कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ महेंद्र कल्याणकर, निवासी जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे , विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार दयालसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री दौंडकर यांच्या पर्यंत पोहोचल्यावर तातडीने सूत्र हलली आणि सदरहू प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मान तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे आणि मंडळ अधिकारी जासई यांनी पूर्ण चौकशी करून सविस्तर अहवाल उप विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना सादर केला. त्यात स्पष्ट म्हटले आहे की गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून घरत कुटुंबीयांची झालेली नोंद चुकीची असून संबंधित फेरफार रद्द करून कायदेशीर वारसांची नोंद करण्यात यावी. असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ही जमीन पुन्हा आपल्या नावावर केली जावी, यासाठी 26 जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा पुनाडेच्या ग्रा.पं.सदस्या मुक्ता अनंत कातकरी यांनी दिला आहे.

Exit mobile version