दहावीचा निकाल जाहीर! राज्यात कोकणाची बाजी; मुली आघाडीवर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून मुलींनी बाजी मारली आहे. यंदा निकालाचा टक्का ९७.९६ आहे. २०२० च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यात कोकण विभाग पहिला तर नाशिक शेवटी

पुणे: ९६.१६

नागपूर: ९७.००

औरंगाबाद: ९६.३३

मुंबई: ९६.९४

कोल्हापूर: ९८.५०

अमरावती: ९६.८१

नाशिक: ९५.९०

लातूर: ९७.२७

कोकण: ९९.२७

Exit mobile version