एमपीएसएस स्कूलमध्ये यश जाधव प्रथम

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील आंबेवाडी-कोलाड येथील इंग्रजी माध्यमाच्या एमपीएसएस स्कूलमध्ये यश जाधव याने 91.40 टक्के गुण संपादित करून स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

शिक्षणमहर्षी रामचंद्र महाडिक यांनी कोलाड विभागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी या शाळेची स्थापना करून शाळेचे रोपटे लावले. आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. येथील दर्जेदार शिक्षणामुळे पालकांचाही या शाळेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिल्याने या वर्षाचा ही निकाल हा 100 टक्के लागला असून, या निकालात द्वितीय क्र. गौरव धामणसे 90.29 टक्के, तृतीय श्‍लोक जांभळे 90 टक्के, चतुर्थ आयुष मोरे व कनिष्क मोरे 97.20 टक्के, तर पाचवा क्रमांक आर्या धनवी 87 टक्के गुण मिळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल चेअरमन रमेश महाडिक, व्हाईस चेअरमन सुनील महाडिक, मुख्याध्यापिका वैशाली महाडिक व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version