| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मुंबई संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही, असे पूर्णपणे मनाशी ठरवले होते. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र देखील मागितले होते. एमसीएने त्याला एनओसी देखील प्रदान केले होते; परंतु, रोहित शर्माच्या आग्रहामुळेच यशस्वी जयस्वाल मुंबईकडून खेळण्यास राजी झाला आहे, असा खुलासा एमसीएच्या अध्यक्षांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अहवालात एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणतात की, रोहित शर्माने यशस्वी जयस्वालला त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मुंबई संघासोबत राहण्यास सांगितले. त्याने स्पष्ट केले की मुंबईसाठी खेळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे, कारण या संघाने 42 रणजी जेतेपदे जिंकली आहेत. रोहितने यशस्वीला असेही सांगितले की, मुंबईने तुला व्यासपीठ दिले आहे हे विसरू नको, त्यानंतर तु इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमवत आहेस. ते पुढे म्हणाले की, यशस्वी जयस्वालने रोहित शर्मा आणि भारत आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर दिग्गजांशी याबद्दल चर्चा केली. त्यानंतर, त्याने एमसीएला एनओसी मागे घेण्यासाठी ईमेल केला आणि आम्ही त्याची विनंती स्वीकारली आहे. आता तो पुन्हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
रोहितच्या सल्ल्यानंतर यशस्वीची घरवापसी
