| मुंबई | प्रतिनिधी |
यंदा पावसाने संपूर्ण राज्यात हाहकार माजवला आहे. यावर्षी मान्सून 27 मे रोजीच राज्यात दाखल झाला होता. परिणामी यंदा पावसानं लवकर आणि दमदार सुरुवात केले होती. तसेच अजूनही राज्यातील काही भागात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती पिकाच्या नुकसानाबरोबर मोठ्या प्रमाणात जमीनही खरडून गेली आहे. या सोबतच घर आणि पशुधन ही वाहून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जसे राज्य सरकार पुढं सरसावलं आहे. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संघटना, संस्था यांनी ही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढं केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील प्रसिद्ध क्रिकेट संघटना म्हणून ओळख असलेली मुंबई क्रिकेट असोसिएशननं सुद्धा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूरग्रस्तांचे अतोनात नुकसान झाले आहे म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. पूरग्रस्तांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ही योगदान असावे म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही 1 कोटी 25 लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीकडे देण्याच्या निर्णय घेतला आहे.







