। नागोठणे । वार्ताहर ।
देहेन (भाकरवड), पो. पोयनाड, ता. अलिबाग येथील यशवंत सुदाम जुईकर यांचे शुक्रवार, दि. 21 जानेवारी रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 72 वर्षांचे होते. वरवठणे (नागोठणे) येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण म्हात्रे यांचे ते सासरे होते. कै. यशवंत जुईकर यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा देवेंद्र, सून शर्मिला, विवाहित मुलगी हर्षाली, जावई, नातवंडे दुर्गेश, निधी, श्लोक असा परिवार आहे. कै. यशवंत जुईकर यांची दशक्रिया विधी रविवार, दि. 30 जानेवारी रोजी व उत्तरकार्य बुधवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी राहात्या घरी होणार असल्याची माहिती नारायण म्हात्रे यांनी दिली.
यशवंत जुईकर यांचे निधन
