खोपोलीत कर्करोग उपचार सुविधांची वर्षपूर्ती

| खोपोली | वार्ताहर |
खोपोली नगरपालिकेच्या सहकार्यातून टाटा मेमोरियल सेंटरने डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात कँन्सर पिडीतांची आणि उपचार सुविधा सुरू केली आहे. त्याला 14 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ब्राह्मणसभा हॉलमध्ये वर्ष पूर्तीची कार्यक्रम आयोजित करून या वाटचालीत ज्या ज्ञात अज्ञातांचे हातभार लागला त्यांचा ही कृतज्ञता व्यक्त करीत सन्मान केला.

या कार्यक्रमासाठी कोकण विभागाचे आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भेट देऊन येथील डॉक्टरांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. टाटा मेमोरियल सेंटरचे डायरेक्ट डॉ.राजेंद्र बडवे,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.पंकज चतुर्वेदी, तहसिलदार आयुब तांबोली, उपमुख्याधिकारी गौतम भगळे, डॉ.संगिता वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.तर खोपोली शहरातील सामाजिक संघटना,कंपन्याचे सीएसआर विभाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ .शर्मिला पिंपळे प्रास्ताविक केले. कमी दरात औषधे देणे उपचार करणे हाच टाटा हाँस्पिटलचा उद्देश असल्यामुळे टाटा नाव असले तरी शासनाच हाँस्पिटल आहे आहे.अशी माहिती डॉ.पंकज चतुवेर्दी यांनी दिली. यावेळी या रुग्णालयात महत्वाची कामगिरी बजावणार्‍या वैशाली तायडे,विमल कळमकर,वैशाली कांबळे,नेहा देशमुख,शशिकला शिंदे,जयश्री रोखडे,पूनम तोंडे,मुमताज सय्यद,आरती मोरे,रुपाली महाडिक,योगिता मुके,श्रावणी जंगम,शीतल जगताप यांच्या सह अन्य कर्मचारी वर्गाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी मेमोरियल सेंटर चांगल काम करीत आहे टाटा समुहातील एका सदस्याच्या पत्नी कँन्सरग्रस्त झाली होती.तिला वेळेत उपचार मिळाला नसल्यामुळेचे मृत्यु झाला होता.पुन्हा अशी वेळ कोणावरही येवू नये यासाठीच त्यांनी स्वतः कडील हिरा विकून बायकोचा (कँन्सर) स्मरनार्थ टाटा मेमोरियल हाँस्पिटल सुरू केले या अनमोल उपक्रमाला खोपोली शाखेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिल्या.

वाढत्या शहररीकरणामुळे कँन्सरचे प्रमाण वाढलयं ते कँन्सरपासून वाचण्यासाठी तंबांखू,स्थूळपणा कमी केल पाहिजे.19 प्रकारचे वेगवेगळे कर्करोग होतात याची आठवण डॉ.राजेंद्र बडवे यांनी करून देत तांबाटी येथे सेंटर सुरू झाल्यावर रक्त तपासणी,इसीजी करण्यासबंधीचे प्रशिक्षण स्थानिक मुलांना देणार,प्रदुषण मुक्त परिसर करण्यासाठी उपाययोजना करू असे उपक्रम राबवून एकमेकांना सहकार्य करून कँन्सरग्रस्तांना खर्चात उपचार दिल्यानंतर रायगड मधून बाहेर जाण्याची गरज नाही असेही डॉ.बडवे म्हणाले. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे मेडिकलच्या स्नेहल मॅडम,प्रेम गायकवाड सोशल वर्कर दिनेश मुसळे, खोपोली कॅन्सर सर्व्हिसेसच्या प्रमुख डॉ.प्रतिभा पाटील आणि टिमने मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी केला.

Exit mobile version