| पेण | प्रतिनिधी |
पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अॅड. मंगेश नेने सी.एस.ई.बी हब, सोबती संस्था, गर्जा रायगड, कर्करोग प्रतिबंध विभाग-खोपोली टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग जनजागृती आणि कर्करोग पूर्वतपासणी शिबीर यामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचा समावेश होता. या शिबिरासाठी पेणमधून सुमारे 125 जणांनी आपली तपासणी करून घेतली. यामध्ये पुढील तपासणीसाठी 50 जणांना टाटा मेमोरियल सेंटर-मुंबईला पाठवण्याचे निश्चित झाले आहे. तसेच या कॅन्सरमुक्त रायगडच्या पहिल्याच शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने हे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी शुभांगी नेने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या शिबिरामध्ये कमीत कमी कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळावेत. म्हणजेच, पेणकर निरोगी आहेत असे आम्ही समजू. तर, बापूसाहेब नेने यांनी भविष्यात असे कॅम्प घेण्यासाठी सर्व परिने मदत करणार, असे आश्वासन दिले. तर आयोजकांमध्ये अॅड. नीता कदम यांनी प्रास्ताविक सादर करून शिबिरामागील हेतू स्पष्ट केले.
दिवसभरात या शिबिराला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. तसेच अॅड. मंगेश नेने यांनादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्करोग प्रतिबंध विभाग-खोपोली टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई टीमचे डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. प्रहतीस्वरण, डॉ. सुप्रिया मांगूळकर, डॉ. भारती भोईर, स्नेहल डी.के. तसेच डॉ. निता कदम, निलेश म्हात्रे, अमित नवाळे, संयोगीता टेमघरे, ज्योती राजे, दिपश्री पोटफोडे, मुस्कान झटाम, राकेश पाटील, राजू संसारे, आणि संतोष पाटील आदींनी मेहनत घेतली.