। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारत सरकार सूचना एवं प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पूणे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय अहमदनगर, केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे व प्रिझम सामाजिक विकास संस्था,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पान पाटील- व्यवस्थापक केंद्रीय संचालक ब्यूरो पुणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी मानवते साठी योग या थीमवर आधारित पथनाट्यातून अत्यंत प्रभावीपणे नागडोंगरी गावात बहुसंख्य जनसमुदायासमोर योगाचे महत्व सांगितले. यावेळी या कार्यक्रमास क्षेत्रीय प्रचार अधिकारी अहमदनगर माधव जायभाई, प्रभारी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अहमदनगर पि.फणिकुमार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांसह बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.