। नवीन पनवेल । वार्ताहर ।
कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संचालित श्री अण्णासाहेब सहस्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा वाकडी शांतिवन येथे सिक रूम आरोग्य सेवा खोलीचे उद्घाटन करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्स यांच्या कार्याला 25 वर्षे पूर्ण झाले. या क्लबने कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संचालित बलवंतराय मेहता पंचायतराज जागृती केंद्र आणि श्री अण्णासाहेब सहस्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा वाकडी शांतिवन यांच्या संयुक्त विद्यमाने सिक रूमसाठी सी. एस. आर. एजन्सी प्रा. लि. आणि इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्स यांच्या मदतीने हा प्रोजेक्ट पुर्ण झाला.
यावेळी सरोज कटीयार, सुनिता जैन, माजी न्या.सत्यरंजन धर्माधिकारी, अर्चना कोतवाल, फाल्गुनी मेहता, शांतिवन संस्थेच्या अध्यक्षा रक्षा मेहता, नितीन खंबाटी, जयश्री धामणकर, विनायक शिंदे, सुधाताई पटवर्धन, विजया गोगटे तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्सच्या सर्व सदस्या, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.