। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयात भारतीय तटरक्षक व राष्ट्रीय सेवा योजना युनिट मुरुड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करुन योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेहबुब नगरबावडी, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, कमांडिंग ऑफिसर विजय तंटा, इक्झ्यूटर ऑफिसर लोकनाथम, असिंस्टट कमांडर आनंदी स्थापक, डेप्युटी कमांडर अमोलकुमार मुसळे, योग प्रशिक्षक प्रमोद मसाल, डॉ. श्रीशैल बहिरगुंडे, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. सुभाष म्हात्रे, गजानन मुनेश्वर, डॉ. नारायण बागुल, डॉ. सीमा नाहिद, डॉ. मधुकर वेदपाठक, संदेश दांडेकर, शैलेश पालशेतकर, गणेश लाड, तटरक्षक अधिकारी, सैनिक आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
योगसाधनेमुळे मनुष्याच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन होऊन शारीरिक, मानसिकदृष्ट्या तो सक्षम होऊन त्याच्यात एकाग्रता व आत्मविश्वासाची निर्मिती होते, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एम.ए.नगरबावडी यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. मेहबुब नगरबावडी, उपप्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी योगा प्रशिक्षक प्रमोद मसाल यांनी विविध प्रकारची योगासने शिकवून त्यांचे महत्त्व व नियम सांगितले.