एलएसपीएम महाविद्यालयामध्ये योग दिन उत्साहात

| अलिबाग | वार्ताहर |

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात योगाभ्यास व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धी वाकडे यांची उपस्थिती लाभली होती. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. लीना पाटील, आय. क्यू. एस. सी कॉर्डिनेटर प्रा. श्रद्धा पाटील उपस्थित होत्या. सुरुवातीस प्रशिक्षिका सिद्धी वाकडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या, आयक्यूएससी कॉर्डिनेटर यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी सुरुवातीस विद्यार्थ्यांना योग दिन साजरा करण्याची पार्श्‍वभूमी समजावून दिली. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्यवाह राजेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. प्राचार्य लिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन गोंधळी, प्रा. प्रवेश पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीपणे साजरा केला. कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच रा.से.यो. विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुरक्षा स्थळे, पियुष वर्तक यांनी केले.

Exit mobile version