द पॉवर ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश बांडागळे

तालुकाध्यक्षपदी महेंद्र सुर्वे यांची निवड
। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण द पॉवर ऑफ मीडियाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी योगेश बांडागळे तर चिपळूण तालुकाध्यक्षपदी महेंद्र सुर्वे व गुहागर तालुकाध्यक्षपदी उमेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
चिपळूण येथील कापसाळ रेस्ट हाउसवर द पॉवर ऑफ मीडिया ह्या रजिस्टर पत्रकार संघटनेचे बैठक पार पडली. यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी बंडागळे यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी तर उपजिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड दयानंद कांबळे व सुर्वे यांची चिपळूण तालुकाध्यक्ष व गुहागर तालुकाध्यक्षपदी उमेश शिदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी दुर्गेश आखाडे, उपाध्यक्षपदी नंदकुमार सुर्वे, रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी सिद्धेश मराठे,लांजा तालुकाध्यक्ष पदी राहुल वर्दे व राजापूर तालुकाध्यक्षपदी गोकुळ कांबळे यांची निवड करण्यात आली.याकार्यक्रमाला द पॉवर ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कदम,कोकण अध्यक्ष इकलाख खान, निसार शेख, दीपक शिंदे, संतोष पिलके,सुरेश पवार, सचिन मोरे,अनिल फाळके,विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version