| पुणे | प्रतिनिधी |
पिंपरी गुरव परिसरात राहणाऱ्या योगेश जांभुळकर यांनी दिल्लीत झालेल्या आशियन पॉवरलिफ्टिंग 2026 मध्ये 1 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. आशियाई स्तरावरील 75 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. योगेश यांनी दिल्लीतही आपले यश कायम राखले आहे. दिल्लीत झालेल्या आशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी मास्टर गटात एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील स्पर्धकांनी एकूण 55 सुवर्णपदके पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत आशिया खंडातील एकूण 252 स्पर्धक सहभागी झाले होते. पाच देशांमधील या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्रातील 31 स्पर्धक होते. ही स्पर्धा वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशन इंडियाफ यांच्याकडून आयोजित करण्यात आली होती.







