। मुबई । वृत्तसंस्था ।
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत. सातत्याने होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र आता सरकारने यावर उपाय शोधला आहे.
ग्रीन हायड्रोजन या इंधनावर चालणार्या गाड्या लवकरात लवकर बाजारात येणार असून या कारच्या वापराने आगामी काळात देशवासियांची प्रदूषणापासून मोठ्या प्रमाणात सुटका होईल.
नवीन इंधनासह ही कार चालवण्यासाठी प्रति किमी फक्त 40 पैसे मोजावे लागणार आहेत. सरकार हायड्रोजनवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देणार आहे. लवकरच देशात हायड्रोजनवर चालणार्या कार बाजारात येणार असल्याचे सांगण्यात आले असून ग्रीन हायड्रोजन 8 रूपये प्रति लिटरने मिळण्याची शक्यत वर्तवली आहे.