महिलेशी गैरवर्तन करणार्‍या इसमाला बेड्या

| पनवेल | प्रतिनिधी |

महिलेच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करून आरोपीने स्वतःचा चेहरा न दाखविता शरीरावरील सर्व कपडे काढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने सदर आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.

करंजाडे येथे राहणार्‍या एका महिलेला त्या घरी असताना आरोपी शुभम खरबे याने तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करून स्वतःचा चेहरा न दाखविता सर्व कपडे काढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबतची तक्रार सदर महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात देताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रवींद्र पारधी, पो.कॉ. पाटील यांनी या आरोपीचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता तो नागपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणी जाऊन त्याच्या घराचा पत्ता शोधून त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली आहे.

Exit mobile version