। पनवेल । प्रतिनिधी ।
एका महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणार्या व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला या पळस्पे फाटा येथील एका बॅटरीच्या दुकानासमोर गाडीची बॅटरी चेक करण्यासाठी थांबल्या असताना बॅटरी दुकानदार याने बॅटरी चेक करून बॅटरी खराब झाली आहे. मी फुकट नवीन बॅटरी घेऊन देतो असे बोलून त्याने सदर महिलेच्या डाव्या हाताला स्पर्श केला व जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





