| पनवेल | प्रतिनिधी |
शुल्लक कारणावरून लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अप्पू वंडाल उर्फ बाब्या याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनसुर, सलमान मोहम्मद इस्लाम सिद्दिकी हा कामोठे सेक्टर 22 येथे राहत असून तो नौपाडा येथे स्टार चिकन शॉप चालवत आहेत. दरम्यान, ते चिकन विकत असताना अप्पू वंडाल हा चिकनच्या दुकानावर चिकनची राहिलेली हड्डी मागू लागला. त्यावेळी दुकानावर गिऱ्हाईक असल्याने सलमान याने त्याला थांबण्याकरता सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच, लाकडी बांबूने सलमानच्या डोक्यावर मारहाण करून त्याला जखमी केले.







