। पनवेल । प्रतिनिधी ।
जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निरीक्षकाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पनवेलमधील सुकापूर येथे घडली आहे. अमोल राठोड (36) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. खांदेश्वर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या जेसीबीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अमोल राठोड हा उलवे येथे राहण्यास होता. तसेच तो ओंकार कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. नवीन पनवेलमधील सुकापूर येथील बालाजी सिम्फनीजवळ नाल्याचे काम सुरू असताना अमोल हा निरीक्षक महणून तेथे देखरेख करत होता. यावेळी जेरीबोचालक आशिकने जेसीबीचा बकेट (फावडा) थेट अमोल यांच्या कमरेत आणि उजव्या मांडीत घुसवला. या भीषण अपघातात अमोल हा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.






