| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथून ब्लड सँपल घेऊन उलवे येथे येताना मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकलसह खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबई विमानतळ जवळ घडली आहे. या अपघाताला मोटारसायकल चालक तरुण स्वतः जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार उलवे पोलिसांनी मृत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मृत विरपाल नारायण गिरासे (21) जळगाव जिल्ह्यातील तालुका पारोळा येथील असून, सध्या तो पनवेलमधील नातेवाईकांकडे राहत होता. तसेच तो उलवेमधील फिनिक्स हॉस्पिटल मध्ये काम करत होता. विरपाल होंडा युनिकॉर्न मोटारसायकलवरुन हॉस्पिटल मधील ब्लड सँपल घेऊन पनवेल येथे गेला होता. त्यानंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तो पनवेल येथून ब्लड सँपल घेऊन उलवे येथे परतत होता. यावेळी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास वाघीवली गाव ते अंबुजा सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगामध्ये जात असताना विरपाल गिरासे यांचा मोटारसायकल वरील ताबा सुटून तो मोटारसायकलसह खड्ड्यामध्ये पडून विरपाल याचा मृत्यू झाला.
मोटार सायकलसह खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606