। पनवेल । वार्ताहर ।
मित्राला वाशी येथे सोडून गोवंडी येथे परतणार्या तरुणाच्या मोटारसायकलला वाशी खाडी पुलावर अपघात झाल्याने सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघाताला मृत तरुण जबाबदार असल्याचे आढळून आल्याने वाशी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव विशाल मनोहर निकम (34) असे असून तो गोवंडी येथील लिंबुनी बाग येथे राहण्यास होता. गत 20 ऑगस्ट रोजी विशाल सोबत काम करणारा त्याचा मित्र रामदास शिवणकर हा विशालकडे गेला होता. मात्र, रात्री उशीर झाल्याने रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास विशाल, रामदासला वाशी येथे सोडण्यासाठी आपली मोटारसायकल घेऊन गेला होता.
रामदासला वाशी येथे सोडल्यानंतर विशाल मोटारसायकलवरुन गोवंडी येथे परतत होता. विशाल वाशी खाडी पुलावर आला असताना, भरधाव वेगात असलेल्या मोटारसायकलवरुन त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे विशाल मोटारसायकल सह खाली पडून गंभीर जखमी झाला.