तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील गाढेश्‍वर मंदिराच्या मागे असलेल्या छोट्या धरणाजवळ एक 20 वर्षीय तरुण बुडाला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. विनायक राम सागर सरोज असे या मृत तरुणाचे नाव आहे. विनायक सरोज (कुर्ला बैल बाजार) याच्या मित्राचा वाढदिवस असल्याने तो पनवेलमध्ये आला होता. पाच ऑगस्ट रोजी ते तीन मित्र गाढेशवर परिसरात फिरायला गेले यावेळी गाढेश्‍वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पाण्यात मौजमजा करत असताना विनायक याला पाण्याचा अंदाज आला नाही. व तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version