। पाली / वाघोशी । प्रतिनिधी ।
पाली-खोपोली राज्य महामार्गावर तिवरे गावाजवळ गुरुवारी (30) सायंकाळी ट्रॅक्टर व मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. शैलेश पिसाळ असे या युवकाचे नाव असून तो सुधागड तालुक्यातील आंबिवली गावचा रहिवासी आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून रात्री साडेआठच्या सुमारास त्याचे शव घरी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.