| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील गांधे आदिवासी वाडीतील (ता. पेण) दीपक निलेश वाघमारे हा तरुण 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कुणासही काही एक न सांगता घरातून निघून गेला आहे. त्यांचे नातेवाईक व इतर सर्वत्र शोध घेऊनही त्याचा शोध न लागल्याने आपला मुलगा दीपक हा हरविल्याची तक्रार त्याचे वडील निलेश वाघमारे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात 5 नोव्हेंबर रोजी दाखल केली आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास नागोठणे पोलीस ठाण्यात 02194-222034 या क्रमांकावर सहाय्यक फौजदार एफ.बी. तडवी यांच्याशी संपर्क साधावा.