तरुणांनी उद्योग-व्यवसायातून प्रगती साधावी : आ. अनिकेत तटकरे

। नागोठणे । वार्ताहर ।
युवा उद्योजक संदेश शेवाळे यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास व कठोर परिश्रमाच्या जोरावर उद्योग व व्यवसायात स्वतःचे नावलौकिक केले. राजकारण व समाजकारण करताना जनतेची प्रामाणिक सेवा करण्याची भूमिका त्यांनी अंगिकारली आहे. संदेश शेवाळे यांनी याद्वारे तरुणांपुढे आदर्श उभा केलाय. त्यांच्याप्रमाणेच इतर तरुणांनीही उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी, असे आवाहन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. पाली-सुधागड येथील शेवाळे इंटरप्राईझेसच्या नागोठण्यातील शोरूमचे उद्घाटन आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते शनिवारी (दि.6) करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून शेवाळे यांच्या नव्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, विलास चौलकर, पिंगोडे सरपंच संतोष कोळी, शेवाळे इंटरप्राईझेसचे मालक संदेश शेवाळे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version