। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील काकरतळे भागातील इमारतीच्या टेरेसवरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.
महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिया किशोर चौधरी (20) ही तरुणी राहत होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिया इमारतीमध्ये येणारे बोरींगच्या पाण्याचा जल वहिनीचा कॉक बंद करण्यासाठी इमारतीच्या छतावर गेली होती. त्यावेळी रियाचा तोल गेला आणि ती इमारतीच्या छतावरून खाली पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रियाला तपासून मृत घोषित केले.
महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.
इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606