रेल्वे अपघातात तरुणीचा मृत्यू

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे मिरानगर भागात रेल्वे रुळ क्रॉस करत असताना रेल्वेची धडक लागल्याने एका 17 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोठणे जवळील कोंडगाव येथे राहणारी तरुणी कृतिका रोहिदास धामणे वय (१७) हि दि . ८ एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास नागोठण्यावरून
कोंडगाव येथील घरी रेल्वे मार्गाने जात असताना मिरानगर ते मुरावाडी रेल्वे मार्गाच्या दरम्यान रुळ क्रॉस करत होते त्याक्षणी पोरबंदर-कुच्चुवेली या रेल्वे गाडीची ठोकर लागल्याने तिच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. बी.डी. भायदे हे करीत आहेत.

Exit mobile version