| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर वसाहतीमधील स्वप्नपुर्ती सोसायटीमधून एक 19 वर्षीय बेपत्ता झाल्याने ती हरवल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. काजल यादव वाघमारे असे या तरुणीचे नाव आहे. तिचे वय 19 वर्षे, उंची 4.2 फुट, रंग सावळा, केस मध्यम, नाक बसके, डोळे काळे, बांधा सळपातळ, चेहरा उभट, अंगात नेसुन सिल्व्हर रंगाचा फुल शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. या तरुणीबाबत कोणास काही माहिती असल्यास खारघर पोलीस ठाणे किंवा पोलीस नाईक शशिकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.
खारघरमधून तरुणी बेपत्ता
