दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी

| पनवेल | वार्ताहर |

विचुंबे ब्रिजच्या सुरुवातीस एका दुचाकीने तरुणीला धडक दिली. या धडकेत तरुणी जखमी झाली आहे. दुचाकी चालका विरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रद्धा अविनाश लांडगे ही विचुंबे येथे घरी जाण्यासाठी पायी पनवेल रेल्वे स्टेशन वरून विचुंबे कडे निघाल्या. त्या विचुंबे ब्रिजच्या सुरुवातीला विचुंबे गावाकडून नवीन पनवेल साईट कडे जाणार्‍या रोडवर आले असता ड्यूक मोटरसायकल स्वाराने भरधाव वेगाने येऊन त्यांना ठोकर मारली. एम एच 46 सी जी 9865 वरील दुचाकी चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून त्यांना ठोकर मारली. या प्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version