| पनवेल | वार्ताहर |
खांदेशर पोलिसांनी विचुंबे गावातून 29 लाख 11 हजारांचा गुटखा जप्त करण्याची कामगिरी केली, या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करण्याचे प्रमाण सुरू आहे. विचुंबे याठिकाणी पान मसाला गुटखा याची विक्री होत असल्याची माहिती खांदेशर पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदरठिकाणी छापा टाकला असता, यावेळी 29 लाख 11 हजार 215 रुपयांचा पान मसाला गुटखा सापडून आला आणि एक होंडा डिओ दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी, संदीप कुमार निषाद, रवींद्र भिंगारकर, गोविंद कुमार निषाद, दिनेश म्हात्रे, गोविंद कुमार, करण राम सोलंके, दिनेश चौधरी, वैभव आखाडे, राजू स्वामी, मुसेफ अन्सारी अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.