| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई शहराच्या विविध भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडली असून, खारघर पोलिसांनी चार बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
या बांगलादेशी नागरिकांमध्ये एक महिला व तीन पुरुष यांचा समावेश आहे. मोहम्मद अरिफ हुसेन अली (25), जमाल उस्मान मंडल (26) पीआरअली रोशन अली मंडल (45) व हसीना पीआरआली मंडल (40) अशी अटक केलेल्या चौघा बांगलादेशींची नावे आहेत. आर एफ कॅम्प खारघर येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड सापडले आहेत. ते कोणत्याही परवानगीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय भारतात राहताना मिळून आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.