| पनवेल | प्रतिनिधी |
नेहमीप्रमाणे भाजीपाला आणण्यासाठी नेरे येथे जाते असे सांगून घरातून निघून गेलेली एक तरुणी अद्याप घरी परत आली नाही म्हणून ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तरुणीचे नाव प्रीती यादव कांबळे (20), रंग सावळा, उंची 5 फूट, बाधा मध्यम, नाकात डाव्या बाजूस पिवळ्या धातुची नथ, केस लांब काळे, अंगात नेसून लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, सोबत मोबाईल फोन आहे. ती कियारा फार्म, शातीवन फाटा नेरे येथून नेहमीप्रमाणे भाजीपाला आणण्यासाठी नेरे येथे जाते असे सांगून घरातून निघून गेली, ती घरी परत आली नाही. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पो. हवा अमर भालसिंग यांच्याशी संपर्क साधावा.







