इंग्लंडची भारतीय फिरकीसमोर परीक्षा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडच्या बॅझबॉलची हवा काढून घेतली. इंग्लंडचा कसोटी संघ गेल्या काही वर्षापासून आक्रमक क्रिकेट खेळत आहे. ब्रँडन मॅक्युलमने प्रशिक्षक पद स्विकारल्यापासून संघाने कसोटी खेळण्याची आपली पद्धत बदलली आहे. त्याच पद्धतीला बॅझबॉल म्हणून संबोधलं जात आहे. सुनिल गावसकरांनी या बॅझबॉलला प्रत्युत्तर म्हणून भारताकडे विराटबॉल आहे असे सांगितले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. गावसकरांनी इंग्लंडविरूद्धच्या विराट कोहलीच्या आकडेवारीचा आधार घेतला. ते म्हणाले की, यंदाच्या कसोटी मालिकेत विराट कोहली हा भारताचे मोठे हत्यार असणार आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरूद्ध 28 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 42.36 च्या सरासरीने 1991 धावा केल्या आहेत.