पनवेल | वार्ताहर |
खारघरमध्ये राहणार्या मोहम्मद सफीउल्ला अन्सारी याने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणार्या मोहम्मद इम्रान अब्दुल्ला शेख (25) याला जबरदस्तीने मोटारसायकलवरुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला दोघा साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत इम्रान शेख जखमी झाला असून, त्याला नेरुळमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर खारघर पोलिसांनी मोहम्मद अन्सारी आणि त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.