| पनवेल । वार्ताहर ।
न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला तिघा लुटारूंनी पनवेल येथील डोंबाळे कॉलेजजवळ नेऊन बेदम मारहाण केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत येथे राहणारे देवानंद खंडारे (35) पनवेल न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कामाला आहे. गेल्या सोमवारी (ता. 17) सायंकाळी 7 वाजता देवानंद न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. या वेळी ठाणा नाकाजवळ आले असताना 20 ते 25 वयोगटातील एका तरुणाने आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याला पुढे सोडण्याची विनंती केली. त्यामुळे देवानंद याने या तरुणाला मोटरसायकलवर बसवून डोंबाळा कॉलेजलगतच्या महादेव मंदिराजवळ नेले होते. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या त्याच्या दोघा साथीदारांनी देवानंदला मारहाण करून हातातील घड्याळ, मोटरसायकलची बॅटरी काढून घेतली होती.