। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील भटवाडी रिस येथील एका तरूण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने रसायनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रसायनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक जनार्दन खंडागळे (वय 17, रा. भटवाडी, रिस) हा 11 वी मध्ये शिक्षण घेत होता. प्रतिकच्या घरची परिस्थिती गरीब होती. त्यामुळे, पुढील शिक्षणास पैसे नव्हते तसेच सततच्या आईच्या आजारपणामुळे व वडिलांना कामधंदा नसल्यामुळे नैराश्यातून प्रतिक याने आपल्या स्वतःच्या घरात छताच्या लोखंडी रॉडला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शिवाजी पानपट्टे अधिक तपास करीत आहेत.







