। पनवेल । प्रतिनिधी ।
एका 28 वर्षीय तरुणाने राहत असलेल्या घराचे हॉलमधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. मयत तरुणाचे नाव अतुल वाघेला असून, त्याने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






