तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील नाणोरे गावच्या हद्दीत हॉटेल साईलीलाजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका वडाच्या झाडावर 32 वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, दि.6 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती नाणोरे गावचे पोलीस पाटील भारत नथुराम पाटोळे (42) रा. नाणोरे, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत प्रफुल्ल बर्नट टोप्पो रा. झारखंड याने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव एका वडाच्या झाडावर अंदाजे 15 फुटांच्या उंचीवरील फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.डी. आघाव करीत आहेत.

Exit mobile version