| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण परिसरातील सार्वजनिक विहिरीत बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
विक्रांत विजय हुंडलीकर असे या तरुणाचे नाव आहे. हा मुंबईमधील चेंबूर येथील रहिवासी आहे. तो मित्रांसोबत वाघ्रणमध्ये आला होता. गुरुवारी दुपारी गावातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र तो पाण्यातून वरती आला नसल्याने त्याचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला. दोन ते तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने अखेर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. परंतु तो बेशुध्द अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तो अगोदरच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.