| रसायनी | प्रतिनिधी |
वाशिवली येथील संदिप पाटील (35) याला गेल्या चार वर्षांपासून फिट येत होती. दरम्यान, संदिप हा सकाळी उठून वाशिवली येथील पाताळगंगा नदीच्या काठावर गेला होता. त्यावेळी त्याला फिट आल्याने तो पाताळगंगा नदी पात्रात पडला. उपस्थित नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला उपचारासाठी चौक येथील ग्रामीण रुणालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून संदिपला मयत घोषित केले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे हे अधिक तपास करीत आहेत.







