। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महापालिका कार्यालयासमोरील पीर करमअली शहा दर्ग्यावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय तरुणाचा उंचावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. अविम मणियार, रा. कच्छी मोहल्ला, पनवेल, असे मृत तरुणाचे नाव आहे. अविम मणियार हा दर्ग्यावर झेंडा लावण्यासाठी वर चढला होता. झेंडा लावत असताना अचानक तो खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र यमगर अधिक तपास करीत आहेत.
दर्ग्यावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पडून मृत्यू
