वीज पडून तरुणाचा मृत्यू

| सातारा | वृत्तसंस्था |

साताऱ्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. माण तालुक्यातील मरगळवाडी येथे युवकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

माण तालुक्यात असणाऱ्या मरगळवाडी या ठिकाणी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला होता. यावेळी मरगळवाडी येथील जगन्नाथ माकु मरगळे (वय 16) या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला. मरगळवाडी येथील कारंडे वस्ती नावाच्या शिवारात जगन्नाथ मरगळे याची आई कामानिमित्त गेलेली असताना तो त्या ठिकाणी आईसोबत गेला होता. सायंकाळच्या सुमारास काम संपून आपल्या घराकडे येत असताना सोसाट्याच्या वारा सुटला होता आणि अचानक विजा चमकू लागल्या. ते घराच्या दिशेने जात असतानाच वीज पडून जगन्नाथ मरगळे याचा जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version