। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोळीतील केंद्रीय भंडारम निगम बॉर्डरच्या समोरील रस्त्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी केलेल्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव रत्नेशकुमार राजकुमार गुप्ता (37) असे आहे. कळंबोली सर्कलकडून बिमा कॉम्प्लेक्स बाजुकडे केंद्रीय भंडारम निगम बोर्डचे समोरील रस्त्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी रत्नेशकुमार हाथा बुक्यांनी व लाकडी दांडक्याने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण केली. या मारहाणीत रत्नेशकुमार हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापुर्वी मयत घोषित केले. याबाबत तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीनही अज्ञातांचा शोध कळंबोली पोलीस घेत आहेत.







